बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता तिच्या अभिनयाची जादू हॉलिवूडमध्ये सुद्धा पसरवतेय. पती निक जोनससोबत लग्न केल्यानंतर ती मुंबईहून लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे. त्यानंतर आता बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने आपले मुंबईतील दोन घरं विकली आहेत. विशेष म्हणजे तिच्या लग्नाचे अनेक विधी मुंबईतल्या याच घरांमध्ये पार पडले होते. त्यामूळे या घरांसोबत तिच्या लग्नाच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या होत्या.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. भारतात अनेक ठिकाणी तिच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. पण नुकतंच तिने मुंबईतले दोन महागडे अपार्टमेंट विकले आहेत. हे दोन अपार्टमेंट विकण्याचा सौदा प्रियांका चोप्राच्या आईने केलाय. तसंच तिचे काही ऑफिस तिने भाड्याने दिले आहेत. मुंबईतल्या ओशिवारामध्ये प्रेसिंत येथील दुसऱ्या मजल्यावरील ऑफिस २.११ लाखांमध्ये भाड्याने दिलं आहे. गेल्या जून महिन्यापासून तिने हे ऑफिस भाड्याने दिले आहे. तर वर्सोवा अंधेरीमधल्या राज क्लासिक प्रॉपर्टीला ७ कोटींमध्ये विकले आहे. दुसरीकडे आणखी एक अपार्टमेंट तिने तीन कोटींना विकले आहेत. प्रियांका चोप्राच्या आईने हा सौदा २६ मार्च रोजी केला होता.

यापूर्वी गेल्याच वर्षी प्रियांकाने काही प्रॉपर्टी विकल्या होत्या. २०२० मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्समधले करण अपार्टमेंटमध्ये असलेलं घर विकलं होतं. अभिनेत्री प्रियांका चोप्रा लॉस एंजेलिसमध्ये राहत असली तरी भारतात तिची आई आणि भाऊ राहतात. त्यांना भेटण्यासाठी प्रियांका अनेकदा भारतात येत असते. परंतू गेल्या वर्षीपासून करोना परिस्थितीमुळे प्रियांका भारतात येणं जमलं नाही.

मुंबई, गोवा आणि अमेरिकेत सुद्धा प्रियांकाचे अनेक प्रॉपर्टी आहेत. अमेरिकेत सुद्धा तिने सोना हे नव रेस्तरॉं सुरू केलंय. तिच्या या रेस्तरॉंमध्ये अनेक भारतीय पदार्थ मिळतात. त्याचप्रमाणे तिने अमेरिकेतमध्ये बेव्हेरली हिल्स इथे आलिशान घर खरेदी केलंय.