बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची गुडन्यूज चाहत्यांना दिली. बाळाची गुडन्यूज दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र त्याबाबत चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रियांका चोप्राच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच प्रियांकाने आई मधू चोप्रा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिने मुलीची एक झलकही दाखवली आहे.

प्रियांका चोप्रा ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच प्रियांका चोप्राने आई मधु चोप्रा यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. आईच्या वाढदिवसानिमित्त प्रियांकाने एक खास फोटो शेअर केला आहे. यात प्रियांका, मधु चोप्रा आणि छोटी मालतीही दिसत आहे. या फोटोत मधु चोप्रा या कॅमेऱ्यात बघून हसत आहेत. तर प्रियांका चोप्रा आणि मालती या एकमेकांकडे पाहताना दिसत आहे. मात्र या फोटोत मालतीचा चेहरा दिसत नाही. यानिमित्ताने प्रियांकाने तीन पिढ्यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे.

हा फोटो पोस्ट करताना प्रियांका म्हणाली, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तू नेहमी तुझ्या या सकारात्मक हास्याने सदैव हसत राहा. तुझ्या आयुष्यातील उत्साह आणि त्यातील अनुभवाने मला खूप प्रेरणा मिळते. तुझी सोलो युरोप ट्रिप हे आतापर्यंतच्या वाढदिवसातील सर्वोत्तम सेलिब्रेशनपैकी एक होते. लव्ह यू टू मून अँड बॅक टू नानी.”

प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केले. त्यांनी जयपूरमध्ये लग्न केले. तर त्याच वर्षी मे महिन्यात ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला. प्रियांका आणि निकच्या मुलीचं नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे ठेवण्यात आलं आहे. नुकतंच तिने तिच्या पोस्टमध्ये याला दुजोरा दिला आहे.

प्रियांकानं आपल्या मुलीचं नाव ठेवताना दोन्ही संस्कृतींचा विचार केल्याचं बोललं जात आहे. मालती हे नाव संस्कृतमधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ आहे ‘लहान सुगंधित फुल’ तर मेरी हे नाव लॅटिन भाषेतील स्टेला मॅरीसमधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ समुद्राचा तारा असा आहे.

Story img Loader