अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ काही दिवसांपूर्वी सहकुटुंब भारतात आली होती. या वेळी लेकीसह प्रियांकाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. यानंतर अनेक मुलाखतींमधून प्रियांकाने मालतीबरोबर असलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. आता ‘मदर्स डे’च्या निमित्ताने प्रियांकाने आपली लेक ‘मालती मेरी’, आई ‘मधु मालती’ तसेच सासूबाई ‘डेनिस’साठी विशेष पोस्ट शेअर केली आहे…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘मदर्स डे’निमित्त आर्या आंबेकरची खास पोस्ट, म्हणाली…

‘मदर्स डे’च्या निमित्ताने प्रियांका चोप्राने तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या स्त्रियांचे आणि तिच्या मुलीचे आभार मानत भावुक पोस्ट शेअर केली आहे. प्रियांकाने तिची मुलगी ‘मालती मेरी’, आई ‘मधु मालती’ आणि सासू ‘डेनिस’सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट पाहून अनेक कलाकारांसह, मित्रपरिवार आणि प्रियांकाच्या चाहत्यांनी या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा देताना म्हणते, “प्रिय आई, मी खूप भाग्यवान आहे, म्हणून मला कायम तुझे प्रेम मिळाले. माझी आई, आजी, काकी यांनी माझ्यावर चांगले संस्कार करीत मला घडवले. आई आणि आजी तुम्ही दोघींनी अतिशय खंबीरपणे मला साथ दिली. आई, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट असून ‘सुपरहिरो’सारखी आहेस आणि मला या जगातील सगळ्या मातांचा आदर आहे.” पुढे सासूबाईंविषयी प्रियांका लिहिते की, “तुम्ही तुमच्या मुलाला खूप चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने वाढवले असून, संपूर्ण कुटुंबाला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.” तसेच “आई म्हणून तू माझी निवड केलीस मी खूप भाग्यवान आहे ‘मालती’… तुला खूप प्रेम” असा शेवट करीत प्रियांकाने मुलीचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्माचे ‘मराठी’ प्रेम चर्चेत; ‘मदर्स डे’निमित्त केली खास पोस्ट

हेही वाचा : रणवीर-आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबाबत धर्मेंद्र यांचा खुलासा; म्हणाले, “त्या दोघांकडे पाहून…”

दरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात ती, आलिया आणि कतरिनासह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra shares post for mom daughter malti and mother in law denise on the occasion of mothers day sva 00