बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. त्यामुळे जोनस कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा जोनस कुटुंबिय चाहत्यांना गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्रियांकाची जाऊबाई सोफी टर्नर ही गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सोफी टर्नरचे बेबी बंप प्लाँनट करतानाचे अनेक फोटो समोर आले आहेत. stjonaschile या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोफीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहे. यात सोफी आणि जो हे दोघेही समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना दिसत आहे. यात सोफी ही गरोदर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक फोटोत ती बेबी बंप प्लाँनट करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. त्यांचे हे फोटो मियामीच्या समुद्रकिनाऱ्यावरील आहेत. यातील सर्व फोटोत सोफी ही बिकनी आणि सनग्लासमध्ये दिसत आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत

तिचे बेबी बंपमधील फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोफी गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. काही दिवसांपूर्वी लंच डेटवर गेलेल्या सोफीचे बेबी बंपसह अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सोफीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. पण अद्याप जोनस किंवा टर्नर कुटुंबातील कोणीही तिच्या गरोदरपणाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

“मी त्याला थेट ब्लॉक करणार…”, फरहान अख्तरच्या लग्नानंतर पूर्वाश्रमीच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सोफी टर्नरने याआधीही पहिल्या मुलाच्या गरोदरपणाची कोणतीही घोषणा केली नव्हती. पण या गुडन्यूजमुळे जोनस कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोफी टर्नर आणि जो जोनास २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर वर्षभरातच त्या दोघांचा साखरपुडा झाला होता.

सोफीने २०१९ मध्ये जो जोनाससोबत लग्न केले होते. जुलै २००० मध्ये त्या दोघांना मुलगी झाली. तिचे विला असे नाव ठेवण्यात आले आहे. मात्र तिचा एकही फोटो अद्याप समोर आलेला नाही. सोफी ही प्रियंका चोप्राची जाऊ आहे. सोफीचा नवरा जो हा निक जोनसचा भाऊ आहे.

Story img Loader