उपनगरातील एका रुग्णालयात कर्करुग्णांसाठीचा वॉर्ड तयार करण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ५० लाखांची देणगी दिली होती. जून महिन्यात प्रियांकाच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. नानावटी रुग्णालयातील कर्करोगासाठीच्या केंद्रास प्रियांकाने ही देणगी दिली. सदर केंद्राचे प्रियांकाच्या हस्ते उदघाटन झाले, यावेळी तिची आईदेखील उपस्थित होती. ही बाब माझ्यासाठी खूप भावनिक असून, काही महिन्यांपूर्वी याच आजारामुळे माझ्या वडिलांचे निधन झाले. मला वडिलांची खूप आठवण येत असल्याचे साश्रुनयनांनी प्रियांकाने सांगितले. ती म्हणाली, कोणावरही असा प्रसंग येऊ नये. या उपक्रमाबरोबर जोडले गेल्याचा मला अभिमान वाटतो. लोकांना मतदान करण्याचे आवाहन करण्याच्या तिच्या मोहीमेबाबत विचारले असता ती म्हणाली, जर मी पंतप्रधान झाले, तर मी देशाला भ्रष्टाचारमुक्त करेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा