अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या हॉलीवुड प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही वेब सिरीज ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा होती. तर आता या सिरीजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेब सिरीजने आता नवा विक्रम नोंदवला आहे.
‘सिटाडेल’मध्ये प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. या सिरीजमध्ये ती धमाकेदार ॲक्शनही करताना दिसत आहे. ॲक्शन, थरार आणि रोमान्सने परिपूर्ण अशी ही सिरीज आहे. या वेब सिरीजची कथा, यातील ॲक्शन सीन्स, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास यशस्वी होत आहे. यामुळेच या वेब सिरीजने अनेक बड्या वेब सिरीजना मागे टाकलं आहे.
अमेरिकेमधील व्हीओडी-ट्रॅकिंग वेबसाइटच्या अहवालानुसार, ‘सिटाडेल’ आता जगातील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजच्या यादीत सामील झाली आहे. असे म्हटले जात आहे की त्याने ‘सक्सेशन’ आणि ‘द मंडलोरियन’ सारख्या हिट वेब सिरीजना मागे टाकलं आहेत. शुक्रवारी म्हणजेच २८ एप्रिल रोजी या सिरिजचे पहिले दोन भाग प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाले. हे दोन भाग प्रदर्शित होतात प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी या सिरीज तोंड भरून कौतुक केलं तर काहींनी ही सिरीज त्यांना न आवडल्याचं सांगितलं. पण तरीही आज टॉप ट्रेंडिंग वेब सिरीजच्या सामील ‘सिटाडेल’ पहिल्या क्रमांकावर आहे.
यामध्ये प्रियांका चोप्रा जोनसबरोबरच स्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिलसारख्या कलाकारांसह रिचर्ड मॅडन यांच्याही मुख्य भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुसो ब्रदर्स AGBO आणि शो-रनर डेव्हिड वील यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.