91 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात हजेरी लावणं हे अनेक कलाकार प्रतिष्ठेचं समजतात. हॉलिवुड आणि बॉलिवुडच्या तारेतारकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातल्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या जोडीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या दोघांनी या सोहळ्यात चक्क एकमेकांना वाकुल्या दाखवल्या. निक आणि प्रियांका चोप्रा एकमेकांना जीभ दाखवत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

Funniest guy I know.

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत जेव्हा ऑस्कर सोहळ्याला पोहचली तेव्हा अनेक प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांनी त्यांना आपल्या कॅमेरात टिपलं. प्रियांकाने परिधान केलेला काळ्या रंगाचा गाऊन तिला अगदी खुलून दिसत होता. या लुकमध्ये प्रियांका हॉट दिसत होती, तर निकने गडद नीळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. हे दोघे जेव्हा आपल्या खास अंदाजात ऑस्कर सोहळ्यासाठी पोहचले तेव्हा त्यांच्याकडेच कॅमेरे आपसूकच वळले. फोटोग्राफर्सनी या दोघांचे असंख्य फोटो आणि पोझेस कॅमेरात टिपले. या दोघांनीही त्यावेळी मजा म्हणून एकमेकांना जीभ दाखवली. हे फोटोही कॅमेरात कैद झाले असून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तसंच प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरही हे फोटो शेअर केले आहेत.

Story img Loader