पावसाळा संपला की वातावरणातील धुळीमुळे डोळ्यांच्या साथीचे आजार पसरतात. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अशीच डोळ्यांची साथ पसरली आहे. सामान्य नागरिकांबरोबरच बॉलिवूडकरदेखील या साथीने त्रस्त आहेत. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा डोळ्यांच्या साथीने त्रस्त असून, डोळे आल्यामुळे यावेळची दिवाळी साजरी करता येणार नाही याची खंत तिला वाटत आहे. सध्या ती संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. परंतु, या आजारातून बरे होण्यासाठी तिने शुटिंगपासून काही काळाची विश्रांती घेतली आहे. टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात ती म्हणते, मी त्रस्त आहे! शुटिंग रद्द! दिवाळी साजरी करू शकणार नाही! डोळे आल्याने आंथरूणातून बाहेरदेखील पडता येत नाहीये. माझ्याकडून कोणाची तरी हत्या होईल! आपल्या सुजलेल्या डोळ्यांचे छायाचीत्रदेखील तिने सोशलमीडियावर पोस्ट केले आहे. छायाचित्राबरोबर पोस्ट केलेल्या संदेशात डोळ्यांकडे न पाहाण्याचा सल्लासुद्धा तिने दिला आहे.
प्रियांकाला डोळ्यांच्या साथीचा फटका
पावसाळा संपला की वातावरणातील धुळीमुळे डोळ्यांच्या साथीचे आजार पसरतात. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अशीच डोळ्यांची साथ पसरली आहे.
First published on: 21-10-2014 at 04:54 IST
TOPICSप्रियांका चोप्राPriyanka Chopraबाजीराव मस्तानीBajirao MastaniबॉलिवूडBollywoodसंजय लीला भन्साळीहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra suffering from conjunctivitis