पावसाळा संपला की वातावरणातील धुळीमुळे डोळ्यांच्या साथीचे आजार पसरतात. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अशीच डोळ्यांची साथ पसरली आहे. सामान्य नागरिकांबरोबरच बॉलिवूडकरदेखील या साथीने त्रस्त आहेत. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा डोळ्यांच्या साथीने त्रस्त असून, डोळे आल्यामुळे यावेळची दिवाळी साजरी करता येणार नाही याची खंत तिला वाटत आहे. सध्या ती संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. परंतु, या आजारातून बरे होण्यासाठी तिने शुटिंगपासून काही काळाची विश्रांती घेतली आहे. टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात ती म्हणते, मी त्रस्त आहे! शुटिंग रद्द! दिवाळी साजरी करू शकणार नाही! डोळे आल्याने आंथरूणातून बाहेरदेखील पडता येत नाहीये. माझ्याकडून कोणाची तरी हत्या होईल! आपल्या सुजलेल्या डोळ्यांचे छायाचीत्रदेखील तिने सोशलमीडियावर पोस्ट केले आहे. छायाचित्राबरोबर पोस्ट केलेल्या संदेशात डोळ्यांकडे न पाहाण्याचा सल्लासुद्धा तिने दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा