बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच प्रियांकाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने तिच्या वॉडरोबची खास झलक चाहत्यांसाठी दाखवली आहे.

प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. गेल्या काही दिवसांपासून ती इन्स्टाग्रामवर विविध फोटो शेअर करताना दिसते. नुकतंच प्रियांकाने इन्स्टाग्रामवर तिच्या घराचा एक फोटो शेअर केला आहे. यात तिने तिच्या वॉडरोबची झलक दाखवली आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोत तिचे बूट, हिल्स आणि चप्पल यांचे कलेक्शन पाहायला मिळत आहे.

“हिंदी राष्ट्रीय भाषा नसेल तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत डब का करता?”, अजय देवगणचा दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर सवाल

प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या या फोटोत तिने मिरर सेल्फी शेअर केला आहे. त्यात तिने तिच्या बुटांचे कलेक्शन दाखवले आहे. तिचे हे कलेक्शन पाहून सर्व चाहते थक्क झाले आहेत. अनेकांनी यावर विविध कमेंटही केल्या आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट करताना अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

“सिनेसृष्टीत जर कोणी प्रगती करत असेल तर…”, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध गायिकेचे स्पष्टीकरण

दरम्यान प्रियांका चोप्रा आता लवकरच एका नव्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. जी ले जरा असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या टॉप तीन अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत. यात प्रियांकासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहेत.

Story img Loader