बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने, सौंदर्याने, आत्मविश्वासाने एक वेगळे स्थान निर्माण करणारी प्रियांका चोप्रा सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. कपड्यांवरून किंवा दिसण्यावरून तिच्यावर झालेल्या टीकांना सडेतोड उत्तर देण्यापासून ते मुलाखतींमध्ये आत्मविश्वासाने आपली बाजू मांडण्यापर्यंत प्रियांका प्रत्येक गोष्टीत बाजी मारताना दिसते. तिच्या आयुष्याच्या या प्रवासाबद्दल खरेतर फार क्वचित ती बोलताना दिसते. पण जेव्हा ती बोलते, तेव्हा तिचा प्रत्येक शब्द तिच्या चाहत्यांसाठी आणि श्रोत्यांसाठी महत्त्वाचा आणि प्रेरणादायी ठरतो. गोलकास्ट फेसबुक पेजने नुकतीच प्रियांकाची एक मुलाखत शेअर केली आहे आणि तिच्या या मुलाखतीमध्ये आत्मविश्वासाच्या आधारावर ध्येय साध्य करणाऱ्या सकारात्मक प्रियांकाची एक अनोखी बाजू आपल्या समोर येते.

आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने पाहणारी प्रियांका या मुलाखतीत म्हणते, ‘मी जशी आहे तशीच तुम्हाला आवडत असेन तर उत्तम आणि जर आवडत नसेन त मला त्याची फिकीर नाही. मी अशीच आहे. मी अमेरिकेत येत असेन किंवा भारतात जात असेन, माझ्या मूल्यांशी मी नेहमी प्रामाणिक असते. मी दुसऱ्या देशात जातेय म्हणून मला स्वत:ला बदलावे लागेल, माझ्या सवयी बदलाव्या लागतील असे तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही खूपच जास्त विचार करत आहात. तुम्ही जसे आहात तसेच लोकांना तुम्ही आवडता, त्यासाठी तुम्ही स्वत:ला बदलू नका.’

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी

वाचा : मी यापुढे रणबीरसोबत काम करणार नाही- कतरिना

तुम्ही कोणत्याही देशात असाल तिथे स्वत:च्या मूल्यांना जपा असे सांगणारी प्रियांका पुढे म्हणते, ‘मी भारतात असेन किंवा इथे अमेरिकेत, माझा मूळ स्वभाव मी कधीच बदलत नाही. तुम्हाला रोज तेच रटाळ आयुष्य जगायचे आहे की प्रवाहाविरोधात जाऊन आपले वेगळे स्थान निर्माण करायचे आहे, हा पर्याय तुमचा आहे. जेव्हा प्रवाहाविरोधात जाऊन तुम्ही जे काही थोडे यश संपादन करता, ते फक्त तुमचे यश असेल. ते इतरांसारखे रटाळ नसेल. जगातील इतर यशस्वी लोकांप्रमाणे न राहता मी माझा मार्ग स्वत: निवडेन, जे फक्त माझे असेल, त्यातून मिळालेल्या यशावर फक्त माझा हक्क असेल.’

वाचा : ‘नच बलिये ८’ जिंकण्यासाठी दिव्यांकाने दिली ‘स्टार प्लस’ला धमकी?

या मुलाखतीतील ‘देसी गर्ल’ प्रियांकाचे हे शब्द नक्कीच तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. प्रियांकाने आपले हेच वेगळेपण जपल्याने ती आज सर्वांत यशस्वी अभिनेत्री आहे असे म्हणायला हरकत नाही.

Story img Loader