‘बबली बदमाश’ गाण्यानंतर आता प्रियांका यशराजच्या गुंडे चित्रपटात कॅब्रे डान्स करताना दिसणार आहे. यशराज फिल्मसच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली असून याबाबतचा अतिरिक्त तपशील उपलब्ध नसल्याचे सांगितले. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन बॉस्को-सिझर करण्याची शक्यता असून या गाण्याच्या चित्रिकरणासाठी एक भव्य सेट उभारण्याचे काम सुऱु आहे. १९७१ आणि १९८८ सालांमध्ये घडलेल्या काही सत्य घटनांवर ‘गुंडे’ चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. अली अब्बास झफरने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्रा चित्रपटाचा निर्माता आहे. सदर चित्रपट पुढील वर्षी १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
‘जंजीर’, ‘क्रिश-३’, ‘मेरी कोम’ आणि ‘गुंडे’ या चार मुख्य चित्रपटांमध्ये प्रियांका दिसणार आहे.

Story img Loader