आपल्या चित्रपटात एकदा एका अभिनेत्रीला घेतले की पुन्हा तिला आपल्या दुस-या चित्रपटात न घेण्याची मधुर भांडारकरची प्रथा आता मोडीत निघणार आहे. त्याची ही प्रथा तो स्वतःच मोडणार आहे. त्याच्या ‘मॅडमजी’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिका साकारणार आहे. यापूर्वी तिने ‘फॅशन’मध्ये मधुर यांच्यासोबत काम केले होते.
यासंबंधीची अधिक माहिती देताना मधुर म्हणाले की, प्रियांका सध्या कॅलेंडर गर्ल आहे. ती मेरी कोमवरील आत्मचरित्रपर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर ती झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’मध्ये काम करणार आहे. त्यामुळे तिच्या तारखांचाही विचार करावा लागणार आहे. ‘मॅडमजी’ चित्रपटाची कथा ही राजकरणात पाऊल ठेवणा-या आयटम गर्लवर आधारित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा