आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी शस्त्रक्रियेचा वापर केलेल्या अभिनेत्रींपैकी एक प्रियांका चोप्रा आहे. काही वर्षापूर्वी तिने तिच्या नाकाची शास्त्रक्रिया केली आहे. पण तिने तिच्या नाकाची शस्त्रक्रिया सौंदर्यासाठी नाही तर दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे केली आहे. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिच्या नावाचा आकारच बदलला. शास्त्रक्रियेनंतर स्वतःला पाहून प्रियांका कमालीची घाबरली आणि तिला स्वतःला ओळखता आले नाही असा खुलासा तिने केला आहे.
आणखी वाचा : “…तर आज ही वेळ आली नसती,” रात्री केलेल्या एका कृतीमुळे काजोल झाली ट्रोल
आंतरराष्ट्रीय आयकॉन बनलेल्या प्रियंका चोप्राने २०२१ मध्ये ‘अनफिनिश्ड’ हे तिचे आत्मचरित्र प्रकाशित केले. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. याच पुस्तकाच्या एका भागात प्रियांकाने तिच्या नाकाच्या अयशस्वी शस्त्रक्रियेबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मला दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. एका कौटुंबिक मित्राच्या सांगण्यावरून मी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांच्या लक्षात आले की माझ्या अनुनासिक पोकळीत पॉलिप आहे, जो शस्त्रक्रियेने काढावा लागेल. जेव्हा डॉक्टर माझ्या नाकातील पॉलिप काढत होते, तेव्हा त्यांनी चुकून माझ्या नाकाचा ब्रिजलाही धक्का लावला आणि त्यामुळे माझ्या नाकाचा आकार पूर्णपणे बिघडला.”
प्रियांकाने पुढे लिहिले, “शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी माझ्या नाकावरील पट्टी काढताच मला माझे नाक दिसू लागले, तेव्हा माझी आई आणि मी खूप घाबरलो. माझे खरे नाक गेले. माझा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसत होता. मी ज्या प्रियांकाला आरशात बघत होते ती मी नव्हतेच. प्रियांकाने पुस्तकात खुलासा केला आहे की, प्रत्येक वेळी तिने स्वतःला आरशात पाहिल्यावर ती तिचा चेहरा ओळखू शकत नव्हती. तिने लिहिले, “मला वाटले नव्हते की मी यातून कधी पूर्णपणे बरी होईन. मीडियाने मला प्लास्टिक चोप्रा हे नाव दिले होते. याचा माझ्या व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम झाला. आधीची शस्त्रक्रिया बिघडल्यानंतर मला नाक ठीक करण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली.”
नाकाची शस्त्रक्रिया करणारी प्रियांका चोप्रा ही एकमेव अभिनेत्री नाही. तिच्याशिवाय दिशा पटानी, श्रीदेवी, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, राखी सावंत, कोएना मित्रा, कतरिना कैफ, आयेशा टाकिया, वाणी कपूर यांसारख्या अनेक अभिनेत्रींनीही नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे.