टीव्ही कलाकार प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येगामचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरु असताना आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिनेदेखील तब्बल दोन-तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे तिच्या जुन्या मॅनेजरने म्हटले आहे.
प्रियांकाचा पूर्वीचा मॅनेजर प्रकाश जाजू यांने ट्विटरवरून तिने दोन-तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटलेय. प्रियांका चोप्रा ही जरी आता खंबीर असली तरी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला फार असुरक्षित वाटत होते. त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण मी तिला वेळीच तसे करण्यापासून थांबवले. पीसी आणि तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असीम यांच्यात बरेच वाद होत असत. याचा तिला बराच त्रास व्हायचा. याबाबत ती मला अगदी मध्यरात्रीही फोन करून सांगत असे, प्रकाश जाजू यांनी म्हटले आहे.
सध्या प्रियांका यशाच्या शिखरावर आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडही आता तिचे दिवाने झालेय. त्यामुळे दुःखातून पुढे जाऊन यश कसे गाठावे हे नक्कीच प्रियांकाकडून शिकण्यासारखे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा