बॉलिवूड सुपरस्टार प्रियांका चोप्राने सलग दुसऱ्या वर्षी ‘सेक्सीएस्ट एशियन वुमन’ किताबावर नाव कोरण्याची किमया साधली आहे. ‘ईस्टन आय’ या वृत्तपत्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी सोशल मिडीयावरून मतदान करण्यात आले होते. त्यामध्ये प्रियांका चोप्राने सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. हा किताब पुन्हा स्वत:कडे राखल्यामुळे मला आनंद झाला आहे. मला मतदान करणाऱ्या लोकांची मी खूप आभारी आहे. त्यांच्यामुळेच हा किताब मी माझ्याकडे ठेवण्यात यशस्वी झाल्याची भावना प्रियांकाने पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. नजीकच्या भूतकाळात प्रियांकाने ‘क्वांटिंको’ या अमेरीकन मालिकेत साकारलेली एफ.बी.आय. अधिकाऱ्याची भूमिका, २०१४ मध्ये ‘मेरी कॉम’ आणि २०१५ मध्ये ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांमधील भूमिका विशेष चर्चेत होत्या. प्रियांका चोप्रा ही उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने टीव्ही, चित्रपट आणि संगीत या तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे. ती एक प्रतिभावंत कलाकार असल्याचे मत स्पर्धेचे आयोजक असणाऱ्या ‘ईस्टन आय’ वृत्तपत्राचे पत्रकार’आझाद नाझीर’ यांनी व्यक्त केले. दरम्यान या स्पर्धेत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ‘सायना इराणीला’ दुसरे आणि ‘द्रष्टी धामी’ला तिसरे स्थान मिळाले आहे. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री ‘दिपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा