तिग्मांशुच्या ‘मिलन टॉकीज’ चित्रपटात नुकतेच इमरान खानऐवजी शाहीदला घेण्यात आले होते. अभिनेता बदलतोच तोपर्यंत आता चित्रपटाची मुख्य अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘मिलन टॉकीज’ला टाटा बाय-बाय केले आहे. या चित्रपटात प्रियांका काम न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाहिद आणि प्रियांका यांच्यातील पूर्वीची मैत्री हे तिचे चित्रपटातून बाहेर पडण्यामागचे कारण असल्याची माहिती आहे. पण, प्रियांका तिच्या इतर चित्रपटांमुळे ‘मिलन टॉकीज’च्या चित्रिकरणाकरिता वेळ देऊ शकत नसल्याने ती या चित्रपटातून बाहेर पडत आहे, असे निर्माती एकता कपूरचे म्हणणे आहे. तसेच, प्रियांका आपल्यासोबत दुस-या चित्रपटात काम करेल या अटीवर मी तिला चित्रपटातून मोकळे केले आहे, असेही एकता कपूर म्हणाली.
प्रियांकाकडे चित्रिकरणाकरिता तारखा नाहीत की, त्यामागचे कारण शाहिद आहे, हे तर माहित नाही. पण, ‘मिलन टॉकीज’च्या निर्माता आणि दिग्दर्शकाला नव्या अभिनेत्रीचा शोध घेण्याचे काम लागले आहे हे नक्की. त्यामुळे, एकता आणि तिग्मांशुने नव्या अभिनेत्रीला शोधाण्याचे काम सुरु केले आहे.

Story img Loader