अभिनय, गायन याशिवाय निर्मिती क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सामाजिक कार्यातही अग्रणी आहे. आपल्या व्यग्र जीवनशैलीतून वेळ काढून ती सामाजिक कार्यही करते. गेल्या १२ वर्षांपासून प्रियांका यूनिसेफशी जोडली गेली आहे. ‘यूनिसेफ’ची ‘गुडवील अॅम्बेसिडर’ म्हणून ती कित्येक वर्षे काम करत आहे. नुकतीच तिने जॉर्डनची राजधानी अमानला भेट दिली. रविवारी ती ‘यूनिसेफ’च्या ‘जॉर्डन कंट्री ऑफिस’मध्ये मुलांना भेटली. तेथील मुलांकडून अरबी भाषा शिकत त्यांच्यासोबत खेळतानाही ती दिसली. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दलची माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in