बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका तिच्या मुलीसोबत चांगला वेळ व्यतित करताना दिसत आहे. प्रियांका चोप्राने आपल्या मुलीच्या या फोटोंनी हे दाखवून दिलं आहे की मुलीच्या बाबतीत प्रियांका सुद्धा एखाद्या सामान्य भारतीय आईसारखीच आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या लेकीच्या गोड फोटोंमध्ये एका खास गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर मुलगी मालतीसह दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्या दोघीही स्विमिंग पूलच्या बाजूला बसून चील करताना दिसत आहेत. प्रियांकाने शेअर केलेल्या मालतीच्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्यावर लेकीचे छोटे पाय दिसत आहेत. मात्र, या दोन फोटोंमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे प्रियांकाच्या मुलीच्या हातात बांधलेला काळा धागा आणि पायात दिसलेलं काळ्या मोत्याचं अँक्लेट. सोनेरी आणि काळ्या मोत्यांनी बनवलेल्या या अँकलेटमध्ये हृदयाच्या आकाराचे डिझाइन आहे.
आणखी वाचा-“प्रत्येकाला आपलं मत…” आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉयकॉट करण्यावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया

भारतात जवळपास प्रत्येक आई आपल्या बाळाचे वाईट नजरांपासून संरक्षण करण्यासाठी, त्याच्या पायात आणि हातात काळा धागा किंवा धाग्यात काळे मोती ओवून तो धागा पायात बांधताना दिसते. प्रियांकाने आत्तापर्यंत आपल्या मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे ती देखील एखाद्या सामान्य आईप्रमाणेच आपल्या बाळाला नजर लागू नये यासाठी काळा धागा हातात बांधत असल्याचं दिसून येत आहे.

आणखी वाचा-सासूबाईंसोबत निक जोनसचा धम्माल डान्स, प्रियांकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आणखी एक व्हिडीओ समोर

प्रियांका चोप्रा कामात कितीही व्यग्र असली तरी जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा ती त्यात कोणतीही कसर सोडत नाही. सध्या प्रियांका मातृत्वाचा आनंद घेत आहे आणि हे तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवरून दिसून येत आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, प्रियंका गेल्या काही काळापासून बॉलिवूड कमबॅकमुळे चर्चेत आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासह आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra wearing black threat to daughter malti marie chpra jonas for najar see photos mrj