भारताची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकेतील ‘क्वांटिको’ या टीव्ही मालिकेतील एफबीआय एजंटच्या भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉइस’ पुरस्कार पटकावला.
अमेरिकेत पीपल्स चॉइस पुरस्कार मिळविणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे. प्रियांकाने इमा रॉबर्ट्स, जॅमी ली कर्टिस, ली मिशेल आणि मार्सिया गे हार्डेन यांसारख्या मातब्बर अभिनेत्र्यांना मागे टाकताना हा पुरस्कार जिंकला. ३३ वर्षीय प्रियांकाने ट्विटरवरून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
मला मत देणाऱ्या चाहत्यांची मी खूप आभारी आहे. तुमच्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला, असे प्रियांकाने ट्विटरवर लिहिले आहे. प्रियांकाने चषकासह एक फोटोही ट्विटरवर दिला आहे.