बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने २०१६ चा पीपल्स चॉईस अॅवॉर्ड पटकावला आहे. अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील ‘क्वांटिको’ या मालिकेतील भूमिकेसाठी प्रियांकाला हे नामांकन मिळाले होते. प्रियांका या मालिकेत ‘एफबीआय’ एजंटची भूमिका करत असून अमेरिकन दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत काम करणारी आणि पीपल्स चॉईस अॅवॉर्ड मिळविणारी ती पहिली बॉलीवूड अभिनेत्री ठरली आहे. ‘पीपल्स चॉइस अॅवॉर्ड’साठी एकूण पंधरा अभिनेत्रींची निवड झाली असून त्यात प्रियांकाचा समावेश आहे. सोशल मीडियावरील लोकप्रिय ‘ट्विटर’ या माध्यमाद्वारे प्रियांकाने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. प्रेक्षकांनी केलेल्या मतदानाच्या आधारावर प्रियांकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
प्रियांकाच्या अमेरिकेतील प्रसिद्धीने सनी लिओनी आश्चर्यचकीत
I am so fortunate!Thank U to everyone who voted for me at the #PCAs! My #PCManiacs-I am nothing without you!Big love pic.twitter.com/Omg31wG7oa
— PRIYANKA (@priyankachopra) January 7, 2016