पीटीआय, भोपाळ – अभिनेत्री प्रियंका चोप्रा प्रकाश झा यांचा अगामी चित्रपट गंगाजल २ मध्ये मुख्य भुमिकेत असणार आहे. या चित्रपटात प्रियंका कर्तव्यदक्ष अधिका-याच्या भुमिकेत असून तिच्या भोवती चित्रपटाचे कथानक फिरणार असणे स्वाभाविक आहे. नेहमी पुरूष अधिकारी कर्तव्यदक्ष असल्याच्या भुमिका असलेले चित्रपट आपण पाहत आलो आहोत. हा चित्रपट नेहमीच्या पठडीतील चित्रपटापेक्षा वेगळा असून यावेळी महिला पोलीस अधिकारी कथेच्या केंद्र स्थानी आहे. त्यामुळे ही भुमिका साकारणे माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असणार आहे.

माझे वडील लष्करात वैद्यकीय अधिकारी होते, ते नेहमी म्हणत वर्दीचा रुबाब काही औरच असतो. त्यांचे हे सांगणे मी या चित्रपटाच्या माध्यमातून अनूभवणार असल्याचे प्रियंकाने सांगितले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन थ्रलर मालिकेमध्ये ती एफबीआय एजंटची भुमिका साकारत आहे.

Story img Loader