भारतीय मुष्टियोद्धापटू मेरी कोम हिचा संघर्षपूर्ण आणि खडतर जीवनप्रवासावर आधारित असलेला ‘मेरी कोम’ हा चित्रपट करमुक्त होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची निर्मिती वायकॉम १८ व संजय लीला भन्सालीने केली आहे.
” ‘मेरी कोम’ करमुक्त होण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. सध्या सेंन्सॉर बोर्डाशी आम्ही चर्चा करत असून सर्व काही सुरळीत झालं तर नक्कीच तुम्हाला आम्ही चांगली बातमी देऊ आणि असचं होईल अशी आम्हाला आशा आहे,” असे वायकॉम १८ चे अजित अंधारे म्हणाले. यापूर्वी, महाराष्ट्र, बिहार, यूपी आणि काही इतर राज्यांमध्ये फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेला ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. त्यामुळे ‘मेरी कोम’देखील करमुक्त होण्याची आशा बाळगली जात आहे. ओमंग कुमारचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात ऑलिम्पिक चॅम्पियन मेरी कोमच्या वैयक्तीक जीवनात निर्माण झालेले अडथळे आणि त्यावर मात करत तिने आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केलेले परिश्रम यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे पण, त्यासोबतच मेरी कोम प्रेमात पडून लग्नबंधनात अडकते आणि जुळ्यांना जन्म देते येथेच कथा संपत नाही. त्यानंतरही जगाला समोरे जाण्याची तयारी आणि आई झाल्यानंतरही मुष्ठीयोद्धा स्पर्धेत खेळण्यासाठीची धडपड याबद्दलची मेरी कोमची कहाणी प्रेरणादायी ठरणारी आहे.

Story img Loader