बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ‘एक्झॉटिक’ हा अल्बम प्रदर्शित झाला आहे. ठरलेल्या तारखेच्या एक दिवसअगोदरच अल्बम सर्वत्र प्रदर्शित झाल्याने प्रियांका निराश झाली होती. तरी या निराशेवर मात करत प्रियांकाने गाणे अधिकृतरित्या प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवरून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांना गाण्याबद्दल आवर्जून प्रतिक्रिया देण्यास सांगितले. गाण्यात अमेरिकन रॅपर पिटबुल याने प्रियांकाला साथ दिली असून गाण्यात हिंदी व इंग्रजी भाषेची सांगड घालण्यात आली आहे.

प्रियांकाचे ‘एक्झॉटिक’ गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा: 

Story img Loader