बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘बाजीराव मस्तानी’च्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. माजी विश्व सुंदरी असलेली प्रियांका पहिल्यांदाच एका राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच ‘दिल धडकने दो’चे चित्रीकरण संपवल्यानंतर प्रियांकाने आपल्या रॉयल लूकची एक झलक दाखवणारे छायाचित्र ट्विट केले आहे.
मात्र, प्रियांकाने तिच्या भूमिकेबद्दल अधिक माहिती दिली नाही. पण मोठ्या अंगठ्या, सोनेरी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या, पांढ-या रंगाच्या साडीवर सोनेरी काट पाहता तीचा हा राजेशाही लूक नक्कीच बाजीरावची पत्नी काशिबाई या भूमिकेसाठी असण्याची शक्यता आहे. या चित्रपटात रणवीर-दीपिका मुख्य भूमिकेत असून हे दोघे बाजीराव आणि मस्तानीची भूमिका साकारणार आहेत.
संजय लीला भन्सालीचा ऐतिहासिक चित्रपट असलेला ‘बाजीराव मस्तानी’ हा राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश येथे चित्रीत करण्यात येणार आहे.

Story img Loader