आगामी ‘रामलीला’ चित्रपटातील प्रियांका चोप्राच्या ‘राम चाहे लीला’ आयटम साँगला सध्या खूप चांगली पसंती मिळत आहे.

‘रामलीला’मधील प्रियांकाच्या आयटम साँगचा फर्स्ट लूक

अभिनेत्री-गायिका प्रियांका या गाण्यात अतिशय मादक रुपात दिसत आहे. हे गाणे यू ट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत त्याला ५० लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. पांढ-या रंगाची चोळी आणि धोती स्कर्ट परिधान करून प्रियांकाने या गाण्यात ठुमके लावले आहेत. तसेच, कंबरेवर काढलेल्या टॅटूमुळे प्रियांकाला अधिक सेन्शुअल रुप मिळाले आहे. सिद्धार्थ-गरिमा लिखिल या गाण्यास इंडियन आयडॉलमधून प्रसिद्ध झालेल्या भूमी त्रिवेदीने गायले आहे. तर, याचे नृत्य दिग्दर्शन प्रभूदेवाचा भाऊ विष्णू देवा याने केले आहे.

‘रामलीला’च्या प्रदर्शनावर न्यायालयाकडून बंदी

Story img Loader