दूरदर्शनवर एकेकाळी गाजलेले रुडयार्ड किपलिंगच्या ‘जंगलबुक’चे विश्व आता मोठय़ा पडद्यावर जिवंत होणार आहे. डिस्नेची निर्मिती असलेल्या या हॉलीवूडपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी शेरखानला आवाज देणाऱ्या अभिनेता नाना पाटेकर यांच्याबरोबर अभिनेत्री प्रियांका चोप्रा, इरफान खान आणि शेफाली शहा यांनी आवाज दिला आहे. नुकताचं या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
‘डिस्ने’च्या ‘प्लेन’ या अ‍ॅनिमेशनपटासाठी आवाज देणाऱ्या प्रियांकाने ‘का’साठी (अजगर) आवाज दिला आहे. ‘द जंगल बुक’ हा चित्रपट भारतात ८ एप्रिलला प्रदर्शित होईल.