यशराज फिल्म्सने त्यांच्या ‘गुंडे’ चित्रपटातील ‘जिया’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. चित्रपटात कॅब्रे डान्सरची भूमिका करणारी प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग यांच्यावर चित्रीत केलेले हे प्रणयरम्य गाणे आहे.
ओसाड भागात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपटात रणवीरने बिक्रम या पात्राची भूमिका साकारली असून, तो या गाण्यात भारदस्त दिसत आहे. सोहेल खान याचे संगीत लाभलेल्या जिया गाण्यास अरिजीत सिंगने गायले आहे.
अली अब्बास दिग्दर्शित ‘गुंडे’ चित्रपटात अर्जुन कपूर आणि इरफान खान यांच्याही भूमिका आहेत. लहानपणी भूरटे चोर असणारे बाला आणि बिक्रम हे मोठे झाल्यावर कोल माफिया बनतात, यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka ranveer heat things up with their new song jiya for gunday