हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘बाजीराव आणि मस्तानी’ यांची प्रेमकथा पडद्यावर साकारणार असल्याची चर्चा गेले बरेच दिवस बॉलीवुडमध्ये रंगली आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. प्रियांका सध्या भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोम हिच्या जीवनकथेवर आधारित चित्रपटासाठी संजय लीला भन्साळींबरोबर काम करत आहे. या चित्रपटासाठी शाहरूख खान, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या ऐतिहासिक चित्रपटात बाजीरावांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग याच्या नावाचा विचार केला जात आहे. त्यामुळे प्रियांका आणि रणवीरची जोडी बाजीराव-मस्तानीच्या रूपात कधी पहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Story img Loader