दिग्दर्शक एकता कपूर तिच्या बालाजी टेलिफिल्म कंपनीद्वारे चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजची निर्मितीही करते. या कंपनीचा माजी कर्मचारी केनिया देशातून बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती एकता कपूरने भारत सरकारला केली आहे.
बालाजी टेलिफिल्मचा माजी कर्मचारी झुलफिकर अहमद खान केनियातील नैरोबी शहरातून बेपत्ता झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो कुठे आहे? याबाबत कोणालाच माहिती नाही. त्याला शोधण्यासाठी एकता कपूरने भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि केनियातील एका फाऊंडेशनला विनंती केली आहे. एकता कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बेपत्ता झालेल्या माजी कर्मचाराच्या फोटो शेअर केला आहे. झुलफिकर अहमद खान हा बालाजी टेलिफिल्म्स मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर होता.
हेही वाचा >> “अनघाला बाळ झालं?”, ‘आई कुठे काय करते’ फेम रुपालीची पोस्ट पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
हेही वाचा >> “लग्न कधी करणार?”, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर यामी गौतमचं भन्नाट उत्तर, पतीबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली…
अभिनेता करण कुंद्रानेही झुलफिकर खानसाठी ट्वीट केलं आहे “मी झुलफिकर खानला फार पूर्वीपासून ओळखतो. लॉक अप शोमुळे मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा होता. जगातील अनेक जागांना तो भेटी द्यायचा. फिरायला गेल्यानंतर तेथील सुंदर फोटो तो पाठवायचा. दुर्दैवाने गेल्या ७५ दिवसांपासून तो बेपत्ता आहे. आम्हाला त्याची काळजी वाटत आहे. यासाठी त्याला शोधण्यासाठी या याचिकेवर स्वाक्षरी करण्याची विनंती करत आहे”, असं म्हणत त्याने चेंज संस्थेने झुलफिकर खानला शोधण्यासाठी तयार केलेल्या याचिकेची लिंकही शेअर केली आहे.
हेही वाचा >>मराठी अभिनेत्रीने १०×२०च्या जागेत बांधलं नवं घर, पोस्ट शेअर करत म्हणाली “दोन वर्षांपासून…”
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, झुलफिकर खानसह मोहम्मद झेद सामी किडवाई हा भारतीय नागरिक आणि केनियातील एक टॅक्सी चालकही बेपत्ता आहे.