Pushpa 3: The Rampage: सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा: द राइज’नंतर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. ५ डिसेंबर २०२४ला प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाला देशातचं नाहीतर जगभरातील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. जागतिक स्तरावर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी २८० कोटींची कमाई केली. सध्या या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ जलवा अजूनही सुरू असताना निर्माते व्हाय. रवि शंकर यांनी ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’बद्दल मोठी अपडेट दिली आहे. तीन वर्षांनी २०२८मध्ये ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा खुलासा रवि शंकर यांनी केला आहे. सध्या अल्लू अर्जुन व सुकुमार इतर चित्रपटाच्या कामात व्यग्र असल्यामुळे ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ चित्रपट लांबणीवर पडला आहे.
रवि शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन अॅटली दिग्दर्शित चित्रपटात काम करणार आहे; ज्याचं चित्रीकरण यंदाच सुरू आहे आणि पुढच्या वर्षी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर अल्लू अर्जुन त्रिविक्रम श्रीनिवासबरोबर चित्रपट करणार आहे. हा चित्रपट २०२७मध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटाचं कामं पूर्ण करण्यासाठी अल्लू अर्जुनला जवळपास दोन वर्ष लागणार आहे. याचदरम्यान पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार राम चरणसह चित्रपट करणार आहेत. या सर्व कामानंतर ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ चित्रपटाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
"#Pushpa3 will release sometime in 2028?. #AlluArjun is doing #Atlee's film next followed by Trivikram's film, it will take 2 years to complete these films?. After these 2 films Pushpa3 will begin"
— AmuthaBharathi (@CinemaWithAB) March 16, 2025
– Mythri Movie Makers pic.twitter.com/bZklu8sbKA
दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने जागतिक स्तरावर १,६५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे आता ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘पुष्पा २: द रुल’मध्ये शेवटी ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ चित्रपटाचा टीझर दाखवला होता. त्यामुळे ‘पुष्पा ३: द रॅम्पेज’ चित्रपटात विजय देवरकोंडाची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, हे कितपत खरं आहे? हे येत्या काळात समोर येईल.