दाक्षिणात्य अभिनेता प्रभास त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील संवादांपासून ते कलाकारांच्या लुकपर्यंत सोशल मीडियावर ‘आदिपुरुष’मुळे अनेक वाद निर्माण झाले. आदिपुरुष पाठोपाठ आता प्रभासच्या दोन चित्रपटांची जबरदस्त चर्चा होत आहे. एक म्हणजे ‘सलार’ आणि दूसरा चित्रपट म्हणजे बहुचर्चित ‘प्रोजेक्ट के’.

‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात प्रभासबरोबर दीपिका पदूकोण, अमिताभ बच्चन कमल हासन असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. नुकतंच यातील दीपिका पदूकोणचा लूक व्हायरल झाला अन् त्या पाठोपाठ या चित्रपटातील प्रभासचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला. आता या ‘प्रोजेक्ट के’च्या प्रभासच्या नव्या पोस्टरवरही प्रेक्षकांनी टीका केली आहे.

Amitabh Bachchan biography
लोक-लोलक : स्वत:ला बच्चन वगैरे समजणं!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
Milind Gawali
मिलिंद गवळी यांनी १०३ वर्षे जुन्या ‘या’ वास्तूला दिली भेट; व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “वेगळ्या विश्वात…”
Chiki Chiki Bubum bum marathi movie
चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; बॅकबेंचर्स मित्रमंडळींच्या रियुनियनची धमाल मस्ती
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज

आणखी वाचा : “असे चित्रपट फ्लॉप होणं…” चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांची ‘आदिपुरुष’वर जोरदार टीका

या नव्या पोस्टरमध्ये प्रभास हा एका भक्कम अशा पोलादी पोषाख करून एकदम अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये प्रभासचा पोशाख आणि एकंदर त्याचा अवतार पाहता लोकांनी हे पोस्टर मार्वल कॉमिकच्या ‘आयर्न मॅन’च्या पोस्टरवरुन चोरल्याचा आरोप केला आहे. ‘आयर्न मॅन’ आणि ‘प्रोजेक्ट के’च्या या पोस्टरमधील साम्य लोकांनी दाखवून दिलं आहे.

काही नेटकऱ्यांनी तर हा प्रभासचा चेहेरा वाटतच नसल्याचंही कॉमेंट करत लिहिलं आहे. बऱ्याच लोकांनी पोस्टरच्या एडिटिंगवर बोट ठेवलं आहे. एकूणच सोशल मीडियावर ‘प्रोजेक्ट के’च्या या नव्या पोस्टरला प्रेक्षक चांगलंच ट्रोल करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असून ‘प्रोजेक्ट के’मध्ये चांगले ग्राफिक्स वापरण्यात येणार आहेत. ‘प्रोजेक्ट के’चे जवळपास ७० टक्केहून अधिक शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे बजेट खूप जास्त असून हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असेल.

Story img Loader