सोनम कपूरची बहिण रीया १९८० साली प्रदर्शित झालेल्या ‘खुबसूरत’ या चित्रपटाचा रिमेक बनवत आहे. मुळ चित्रपटात अशोक कुमार यांनी साकारलेली भूमिका लोकप्रिय बंगाली अभिनेता प्रसेनजीत चॅटर्जी करणार आहेत. तसेच, ‘क्वीक गन मुर्गन’ चित्रपटांने प्रसिद्धीस आलेला शशांक घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
प्रसेनजीत म्हणाले की, मी कथा ऐकली आणि ती मला आवडली आहे. मुळ चित्रपटात अशोक कुमार यांनी साकारलेली पित्याची भूमिका मी करणार आहे. मी ‘खुबसूरत’ चित्रपट पाहिला आहे. आता, याचा रिमेक होत असून या चित्रपटाचा मीसुद्धा एक भाग असल्याने मला आनंद होत आहे. बहुतेक नोव्हेंबरमध्ये मी चित्रपटाच्या चित्रिकरणाकरिता काम करण्यास सुरुवात करेन, असेही ते म्हणाले.
१९८० सालातील ‘खुबसूरत’ चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केले होते. या चित्रपटात रेखा, दिवंगत अभिनेता अशोक कुमार आणि राकेश रोशन यांनी मुख्य भूमिका केली होती.

Story img Loader