पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ (AICWA) नं बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालत असल्याचं जाहीर केलं आहे. आमच्यासाठी देश पहिला आहे आणि आम्ही देशासाठी नेहमीच उभं राहू असं AICWA म्हटलं आहे. आपण अधिकृतरित्या पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये काम करण्यावर बंदी घालत असल्याचं AICWA परिपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.
पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो. यापुढे एकाही पाकिस्तानी कलाकाराला बॉलिवूडमध्ये काम करता येणार नाही. पाकिस्तानी कलाकारांवर आम्ही बंदी घालत आहोत. जो कोणी पाकिस्तानी कलाकारांना काम देईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ नं आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
All India Cine Workers Association announce a total ban on Pakistani actors and artists working in the film industry. #PulwamaAttack pic.twitter.com/QpSMUg9r8b
— ANI (@ANI) February 18, 2019
तसेच असोसिएशननं शहीदांना श्रद्धांजलीही वाहिली आहे. आमच्यासाठी देश पहिला आहे आणि आम्ही देशासाठी नेहमीच उभं राहू असं असं AICWA म्हटलं आहे. तर रविवारी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’कडून मुंबईच्या फिल्मसिटीत जोरदार निदर्शने करण्यात आली होती. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना स्थान दिले जाणार नाही, त्यांची गाणीही भारतात रिलीज केली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला होता.
मनसेच्या चित्रपट सेनेनंही पाकिस्तानी गायकांना काम देणाऱ्या देशातल्या बड्या मुझ्यिक कंपन्याना इशारा दिला होता. जर या कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांना काम देणं बंद केलं नाही तर मनसे स्टाइल उत्तर दिलं जाईल असा इशारा देण्यात आला होता त्यानंतर टी सीरिजनं राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम यांची गाणी आपल्या युट्यूब अकाऊंटवरून काढून टाकली.