कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू, राजकारणातील दिग्गजांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ ट्वीटरवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पुनीतच्या निधनाची बातमी देत असताना, कन्नड न्यूज चॅनल BTV वृत्तनिवेदिकेला रडू कोसळले. त्यानंतर तिचे सहकारी तिचे सांत्वन करत असताना दिसत आहेत.

पुनीत यांना काल (शुक्रवारी २९ ऑक्टोबर) दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

Story img Loader