‘मस्ती’ चा सिक्वल ‘ग्रॅण्ड मस्ती’ला प्रदर्शित होण्याआधीच झटका बसला आहे. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये ‘ग्रॅण्ड मस्ती’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालायने हा निर्णय दिला आहे. चित्रपटात अश्वलील संवाद असल्यामुळे प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका दिनेश चढ्ढा यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
विवेक ओबरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदसानी आणि मंजिरी फडणीस, सोनाली कुलकर्णी यांची भूमिका असलेला हा सिनेमा २००४ साली प्रदर्शित झालेल्या‘मस्ती’चा सिक्वल आहे. येत्या शुक्रवारी १३ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाला दिलेल्या सर्टिफिकेटवर सेन्सॉर बोर्डाने पुन्हा विचार करुन आदेश देण्याची विनंतीही चढ्ढा यांनी केली आहे.

Story img Loader