प्रसिद्ध पंजाबी गायक नछत्तर गिलची पत्नी दलविंदर कौर यांचं निधन झालं आहे. त्या ४७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. नछत्तर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १४ नोव्हेंबरला (सोमवारी) नछत्तरच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला. दलविंदर आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुलगी सासरी जाताच नछत्तर यांच्या पत्नीची प्राणज्योत माळवली.
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, १५ नोव्हेंबरला (मंगळवारी) दलविंदर यांचं निधन झालं आहे. मुलीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाय आज (१७ नोव्हेंबर) मुलाचा विवाहसोहळा संपन्न होणार होता. पण त्याचपूर्वी गिल कुटुंबियांच्या वाट्याला दुःख आलं.
दलविंदर या गेल्या काही काळापासून कर्करोगाशी सामना करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. तसेच उपचारादरम्यान त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. दलविंदर यांच्या निधनानंतर नछत्तर गिलचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.
आणखी वाचा – ठरलं हो! अभिनेत्री वनिता खरात ‘या’ महिन्यात बॉयफ्रेंडसह विवाहबंधनात अडकणार, लग्नाची जोरदार तयारी सुरू
नच्छतर हा एक उत्तम गायक आहे. त्याचे वडीलही गायक होते. बऱ्याच पंजाबी चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आहेत. त्याच्या अनेक गाण्यांना युट्युबवर लाखो व्ह्युज मिळतात. शिवाय सोशल मीडियावरही नच्छतरचे लाखोच्या घराच चाहते आहेत.