पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंजाबसह संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. दरम्यान सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूपूर्वी त्याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. मृत्यू होण्याच्या ४ दिवसांपूर्वी सिद्धूने ही पोस्ट केली होती.

सिद्धू मुसेवाला हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायचा. तो नेहमी त्याच्या गाण्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असायचा. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धूच्या मृत्यूच्या चार दिवसांपूर्वी त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने त्याच्या गाण्याचा व्हिडीओ इनस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले होते.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Little boy funny video after he was fail in exam I was in tension due to failure, but my friend also failed
शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका
Rahul Gandhi
Rahul Gandhi : भाजपा खासदाराचा राहुल गांधींवर धक्काबुक्की करुन पाडल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाले, “मला संसदेत…”
laxmikant berde daughter swanandi berde share emotional post for father death anniversary
“बाबा, तुम्हाला जाऊन २० वर्ष उलटून गेली पण…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्ताने लेकीची भावुक पोस्ट; म्हणाली, “तुमचा आत्मा मला…”

हे गाणे शेअर करताना त्याने पंजाबीमध्ये कॅप्शन दिले होते. “याला विसरुन जा, पण मला चुकीचे समजू नका”, असे त्याने कॅप्शन देताना म्हटले होते. त्याचे हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. त्याचाच व्हिडीओ त्याने शेअर केला होता.

सिद्धू मुसेवाला याचे नवीन गाणे चार दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. लेवल्स असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याला अवघ्या ६ दिवसांत ६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूट्यूबर्स युजर्सना हे गाणे खूप आवडले आहे.

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत मुसेवाला यांच्यासोबत असलेले आणखी दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली.

Story img Loader