Pushpa 2 Advance Bookings : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा २’ सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहेत. प्रदर्शित होताच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवणार असं चित्र दिसत आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने तब्बल १०० कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटासह ‘बाहुबली २’चा विक्रमी रेकॉर्ड ‘पुष्पा २’ चित्रपटाने मोडला आहे आणि ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांपर्यंत झेप घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅकलिंकवर दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने परदेशात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर देशभरात या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ७० कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच एकूण या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच १०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अशा पद्धतीने दमदार कमाई करणारा हा दुसरा भारतीय चित्रपट आहे. याआधी ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटानेही ॲडव्हान्स बुकिंगमध्ये अशीच कमाई केली होती.

हेही वाचा : पुन्हा कर्तव्य आहे: आकाश आणि वसुंधराचं नातं मोडलं! प्रोमो पाहून प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

‘पुष्पा २’ चित्रपटाचे संपूर्ण भारतात २८ हजारांहून अधिक शो होणार आहेत. त्यासाठी तब्बल २० लाखांहून जास्त तिकिटे विकली गेली आहेत. हा चित्रपट २डी, ४डीएक्स आणि आय मॅक्समध्ये उपलब्ध असून तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘बाहुबली २’ ने ९० कोटींची कमाई केली होती, तर ‘केजीएफ चॅप्टर २’ने ८० कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘पुष्पा २’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीचे आकडे पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार आणि विक्रमी रेकॉर्ड बनवणार असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची ओपनिंग बॉक्स ऑफिसवर २०० ते ३०० कोटींपर्यंत पोहचू शकते, अशा शक्यता नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

‘पुष्पा २’ चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता पाहता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात केली. ३० नोव्हेंबरपासून ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.

हेही वाचा : Bigg Boss 18: शोमध्ये येण्याआधी शिल्पाचं बहीण नम्रता शिरोडकरशी झालं होतं भांडण, भावुक होत अनुराग कश्यपला म्हणाली, “दोन आठवडे…”

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वल आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात पुष्पा आणि श्रीवल्ली या दोघांची लव्ह स्टोरी तसेच भंवर सिंह शेखावतबरोबरची दुश्मनी पहायला मिळाली. आता दुसऱ्या भागात याच चित्रपटाची पुढील कथा पहायला मिळणार आहे. चित्रपटाची गाणी, टिझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 advance booking crosses rs 100 crore rupees overtakes rrr and kgf 2 movie record rsj