Pushpa 2 Allu Arjun Arrest Video: तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादमधून पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली. त्याच्या अटकेआधीचा व्हिडीओ समोर आला आहे.

अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली, त्याआधी तो त्याची पत्नी स्नेहाशी बोलताना दिसतोय. यावेळी स्नेहा काळजीत असल्याचं दिसत आहे. अल्लू व स्नेहाच्या भोवती बरीच गर्दी दिसत आहे. यावेळी अल्लू पत्नीच्या गालावर किस करतो आणि नाश्ता करतो आणि नंतर पोलिसांबरोबर बाहेर पडतो. पुढे अल्लू अर्जुन हसत हसत पोलिसांबरोबर जाऊन गाडीत बसतो, असं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अल्लूला अटक झाली, त्यावेळी त्याने घातलेल्या हूडीने लक्ष वेधले आहे. ‘फ्लॉवर नहीं, फायर है मैं’ असं त्याच्या हूडीवर लिहिलं आहे.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Umesh Kamat
Video: उमेश कामतने घेतली ‘ही’ बाईक; पत्नी प्रिया बापटसह केली पूजा, व्हिडीओ शेअर करत दाखविली पहिली झलक
Nupur Shikhare Ira Khan Trending Marathi Reel Viral
Video: ‘आले तुफान किती…’ म्हणत नुपूर शिखरेचं पत्नी आयरा खानबरोबर रील; क्रांती रेडकरसह चाहत्यांना हसू आवरेना
singer armaan malik got married to aashna shroff
प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने गुपचूप उरकलं लग्न; पत्नी आहे वयाने मोठी, विवाहसोहळ्याचे फोटो आले समोर
Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”

हेही वाचा – Allu Arjun Arrest: ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला राहत्या घरातून अटक; ‘त्या’ घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई!

अल्लू अर्जुनच्या अटकेचा व्हिडीओ पल्लव पालिवालच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. महिलेचा मृत्यू झाला, यात अल्लू अर्जुनची काहीही चूक नाही, ही थिएटर मालकाची चूक आहे, त्यामुळे त्यांना अटक व्हायला हवी, असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी अल्लू अर्जुनला अटक होणं हा पब्लिसिटी स्टंट असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

नेमकं प्रकरण काय?

४ डिसेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक करून चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात नेलं आहे. महिलेच्या मृत्यूची नोंद याच पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Story img Loader