Pushpa 2 Box Office Collection Day 1: सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक सुकुमार यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ गुरुवारी (५ डिसेंबर रोजी ) जगभरात प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी लोक तुफान गर्दी करत आहेत. या चित्रपटाची लोकांमध्ये खूप क्रेझ आहे. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल आहेत, तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत शो चालवले गेले. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. ‘पुष्पा’ने ग्रँड ओपनिंग केली असून अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत शाहरुख खानचा ‘जवान’, रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’, यशचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ आणि प्रभासचे ‘कल्की’, ‘बाहुबली 2’ यासारख्या अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. आता ‘पुष्पा 2’ हा हिंदीमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा पॅन इंडिया सिनेमा ठरला आहे.

हेही वाचा – पुष्पा-श्रीवल्लीचा रोमान्स घरबसल्या पाहता येणार, Pushpa 2 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

‘पुष्पा 2’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर सॅल्कनिकच्या वृत्तानुसार, ‘पुष्पा 2’ ने पहिल्या दिवशी भारतात तब्बल १७८.४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यामध्ये तेलुगू भाषेत सर्वाधिक ९५.१ कोटी, हिंदीमध्ये ७०.३ कोटी, तामिळ भाषेत सात कोटी, कन्नड भाषेत एक कोटी आणि मल्याळम भाषेत या चित्रपटाने पाच कोटी रुपये कमावले.

हेही वाचा – Pushpa 2 च्या निर्मात्यांना मोठा धक्का; ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाइन लीक झाला चित्रपट

अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड

‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाने जबरदस्त कमाई करत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी हिंदी भाषेत ६५ कोटींचा व्यवसाय केला होता. तर, रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाने हिंदी भाषेत ५४ कोटींची कमाई केली होती. आता अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे. या चित्रपटाने हिंदी भाषेत ६७ कोटी रुपये कमावले आहेत. सुट्टीचा दिवस नसतानाही या सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे. आता वीकेंडला या चित्रपटाच्या कमाई पहिल्या दिवसाच्या तुलनेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Pushpa 2 Movie Review : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचा चित्रपट कसा आहे? सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…

सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मैथ्री मूव्ही मेकर्सने केली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासह मल्याळम अभिनेता फहाद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘पुष्पा 2’ हा अल्लू अर्जुनच्या २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.