Pushpa 2 Box Office Collection Day 10: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता १० दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर प्रत्येक दिवशी कोट्यावधींची कमाई सुकुमारचा चित्रपट करत आहे. कमाईबरोबरच ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे.

१३ डिसेंबरला, शुक्रवारी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी अभिनेत्याची सुटका झाली. अल्लू अर्जुनच्या या अटक प्रकरणानंतर ‘पुष्पा २: द रुल’ ( Pushpa 2 ) चित्रपटाच्या कमाईत शनिवारी ७१ टक्क्यांनी वाढ झाली.

हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिषेक गावकरने लग्नानंतर बायकोचं नाव का बदललं? वाचा किस्सा

४ डिसेंबरला हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात ‘पुष्पा २: द रुल’च्या ( Pushpa 2 ) प्रिमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा जखमी झाला. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने एफआयआर दाखल केलं; ज्यामुळे अल्लू अर्जुनला १३ डिसेंबरला अटक करण्यात आली. एक रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेता १४ डिसेंबरला सकाळी तुरुंगातून बाहेर पडला. पण या सर्व प्रकरणाचा परिणाम ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाच्या कमाईवर झाला नाही. उलट शनिवारी चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली.

हेही वाचा – नांदा सौख्यभरे! अखेर किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर अडकले लग्नबंधनात, मोठ्या थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

हेही वाचा – Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वरातीत मराठी कलाकारांचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ आला समोर

Pushpa 2 चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

‘पुष्पा २: द रुल’ ( Pushpa 2 ) चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी ( १४ डिसेंबर ) ६२.३ कोटींचा व्यवसाय केला. यामधील ४६ कोटी हिंदी व्हर्जनने कमावले. तर १३ कोटींची कमाई तेलुगू व्हर्जनने केली. शुक्रवारी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने फक्त ३६.५ कोटींची कमाई केली होती. पण, शनिवारी यात चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने भारतात ८२४ कोटींचा गल्ला जमवला आहे. यातील ४९८ कोटी हिंदी व्हर्जनने कमावले आहेत. सध्या तेलुगू व्हर्जनपेक्षा हिंदीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने एकूण कमाईत ‘जवान’ आणि ‘आरआरआर’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे.

Story img Loader