Pushpa 2 Box Office Collection Day 17: सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड करत आहे. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर पुष्पाची हवा जोरदार आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. पण, शनिवारी या चित्रपटाने किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या.

‘पुष्पा २: द रुल’ ( Pushpa 2 ) चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी ( १४ डिसेंबर ) ६२.३ कोटींचा व्यवसाय केला होता. यामधील ४६ कोटी हिंदी व्हर्जनने कमावले. तर १३ कोटींची कमाई तेलुगू व्हर्जनने केली होती. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या शनिवारी म्हणजे १७व्या दिवशी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. शनिवारी २५ कोटींचा गल्ला अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने जमवला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कमाईचा आकडा १०२९.९ कोटी झाला आहे.

Image of AIMIM leader Akbaruddin Owaisi.
Pushpa 2 Stampede : “चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, अभिनेता म्हणाला चित्रपट हिट होईल”, नाव न घेता ओवैसींचा अल्लू अर्जुनवर आरोप
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
The song Yellow Yellow from the movie Fasklass Dabhade is released
‘फसक्लास दाभाडे’मधील ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित
Cabinet Portfolio Allocation
Cabinet Portfolio Allocation : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणतं खातं कोणाकडे? वाचा संपूर्ण यादी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Gen Beta
Gen Beta (2025-2039):आजपासून दहा दिवसांनी होणार ‘Gen Beta’ चा जन्म; पिढ्यांचे वर्गीकरण कोणी आणि का केले?

हेही वाचा – ‘कलर्स मराठी’वरील मालिकांचा २३ डिसेंबरला रंगणार विशेष भाग; ‘अशोक मा.मा.’मध्ये येणार ट्विस्ट, तर ‘इंद्रायणी’ मालिकेत….

एकूण कमाईच्या आकड्यांमध्ये तेलुगू भाषेतील चित्रपटाने आतापर्यंत ३०२.३५ कोटी, हिंदीमध्ये ६५२.९ कोटी, तमिळमध्ये ५३.४ कोटी, कन्नडमध्ये ७.२४ कोटी आणि मल्याळममध्ये १४.०१ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात ‘पुष्पा २: द रुल’ ( Pushpa 2 ) चित्रपटाने १६०० कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा – Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, ४०० ते ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘पुष्पा २: द रुल’ ( Pushpa 2 ) चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिलसह श्रीतेज, अनासुया भारद्वाज, जगदीप प्रताप, जगपति बाबू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. २०२४ संपण्यापूर्वी ‘पुष्पा २: द रुल’ बरेच रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे. तसंच आता हॉलीडे, ख्रिसमस आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा – लवकरच बंद होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कार्तिकी गायकवाडशी आहे खास कनेक्शन, गायिका पोस्ट करत म्हणाली….

‘पुष्पा २: द रुल’ ( Pushpa 2 ) चित्रपटाच्या १५ दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या दिवशी-१६४.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी-९३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी-११९.२५ कोटी, चौथ्या दिवशी ११४१.०५ कोटी, पाचव्या दिवशी-६४.४५ कोटी, सहाव्या दिवशी ५१.५५ कोटी, सातव्या दिवशी-४३.३५ कोटी, आठव्या दिवशी-३७.४५ कोटी अशी पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण ७२५.८ कोटींची कमाई केली होती. नवव्या दिवशी-३६.४ कोटी, दहाव्या दिवशी-६३.३ कोटी, अकाराव्या दिवशी-७६.६ कोटी, बाराव्या दिवशी-२६.९५ कोटी आणि तेराव्या दिवाशी-२४.३५ कोटी, चौदाव्या दिवशी २०.५५ कोटी, पंधराव्या दिवशी-१७.६५ कोटी अशाप्रकारे दुसऱ्या आठवड्यात ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने एकूण २६४.८ कोटींची कमाई केली. तसंच सोळाव्या दिवशी १४.३ कोटींचा व्यवसाय सुकुमारच्या चित्रपटाने केला.

Story img Loader