Pushpa 2 Box Office Collection Day 3 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २०२१ मध्ये ‘पुष्पा’चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. यानंतर आता तब्बल ३ वर्षांनी आलेला ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा २’चं सध्याचं कलेक्शन पाहता लवकरच हा चित्रपट लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल हे स्पष्ट झालं आहे. अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 ने संपूर्ण भारतात पहिल्या दिवशी १६४.२५ कोटींची विक्रमी कमाई केली. ओपनिंग डेलाच सिनेमाने सगळे रेकॉर्ड्स मोडले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली. ‘पुष्पा २’ दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींचा गल्ला जमावला. पण, तिसऱ्या दिवशी हा आकडा पुन्हा एकदा शंभर कोटींच्या पार गेला आहे. Pushpa 2ने तिसऱ्या दिवशी तब्बल ११५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे भारतातच चित्रपटाचं एकूण कलेक्शन ३८३.७ कोटी झालं आहे. असं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. यावरून चित्रपट लवकरच ४०० कोटी कमावेल हे स्पष्ट झालेलं आहे.

हेही वाचा : लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो

दिवसभारतातील नेट कलेक्शन
पेड प्रीव्ह्यू१०.६५ कोटी
पहिला दिवस१६४.२५ कोटी
दुसरा दिवस९३.८ कोटी
तिसरा दिवस११५ कोटी
एकूण३८३.७ कोटी ( भारतातील एकूण कलेक्शन )
Pushpa 2 कलेक्शन आकडेवारी

‘पुष्पा २’ सिनेमा तेलुगु, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. यापैकी या सिनेमाने हिंदी भाषेत २००.७ कोटी, तेलुगू इंडस्ट्रीत १५१.०५ कोटी, तामिळ भाषेत २१ कोटी, मल्याळम भाषेत ८.५ कोटी तर कन्नड भाषेत २.४५ कोटींची कमाई केली आहे. याशिवाय जगभरात ‘पुष्पा २’ने एकूण ५५० कोटी कमावले आहे. त्यामुळे जगभरातील आकडेवारीत सर्वात जलदगतीने ५०० कोटी कमावणारा हा पहिल्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा : “प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”

शाहरुखच्या ‘जवान’ला टाकलं मागे

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्या शनिवारी हिंदी भाषेत ६८.७२ कोटी कमावले होते. ही त्यावेळची सर्वाधिक कमाई होती. पण, आता हा रेकॉर्ड अल्लू अर्जुनने मोडला आहे. Pushpa 2ने प्रदर्शनानंतरच्या पहिल्या शनिवारी एका दिवसात ७३.५ कोटी कमावल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 box office collection day 3 allu arjun film take over srk jawan know the whole collection sva 00