दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून अनसूया भारद्वाजला ओळखले जाते. ‘पुष्पा’ चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. मात्र सध्या अनसूया एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. यात ती ढसाढसा रडताना दिसत आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अनसूयाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रडताना दिसत आहे. यात व्हिडीओला कॅप्शन देताना तिने तिच्या रडण्याचे कारणही सांगितले आहे.
आणखी वाचा : “एखाद्याची कविता रील बनवण्यासाठी वापरताना…”, जितेंद्र जोशीने व्यक्त केला संताप, म्हणाला “नावाचा उल्लेखही…”

mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स

अनसूयाची संपूर्ण पोस्ट

“नमस्कार!! तुम्ही सर्वजण बरे असाल, अशी मी आशा बाळगते. मला माहिती आहे की जे कोणी माझी ही पोस्ट पाहत असतील, ते गोंधळात पडले असतील. माझ्या माहितीप्रमाणे सोशल मीडियाद्वारे आपण जगभरातल्या लोकांबरोबर संवाद साधू शकतो. याचा वापर करुन आपण एकमेकांना आधारही देऊ शकतो. चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. एकमेकांची जीवनशैली, संस्कृतीही यातून समजू शकतो. तसेच आनंद आणि दु:खही वाटून घेता येते.

याच सोशल मीडियाचा वापर करुन मी माझ्या वाईट क्षणांबद्दल चाहत्यांना सांगू इच्छिते. मी ज्याप्रकारे माझे फोटोशूट, आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करते, त्याचप्रकारे मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मी फोटोसाठी देणाऱ्या पोझ, फोटोशूट, डान्स, हसणं आणि तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्याचा एक भाग आहात. त्यातून तुम्हा सर्वांना माझ्या भावना कळतात. हे माझ्या आयुष्याचे काही टप्पे आहेत ज्या ठिकाणी मी खंबीररित्या जीवन जगू शकत नाही. मी कमजोर व्यक्ती आहे.

पण मी एक सेलिब्रेटी असल्याने मला माझ्या भावनांबद्दल तटस्थपणे विचार करावा लागतो. मी कितीही खंबीर असल्याचे दाखवत असली तरी मी तशी नाही. जेव्हा माझ्यातील सहनशील वृत्ती संपते तेव्हा मी स्वत:ला वेळ देते. मी खूप रडते. त्यानंतर एक-दोन दिवसांनी पुन्हा त्याच जोमाने उभी राहते. #ItsOKtoBeNotOK हे देखील महत्त्वाचे आहे. विश्रांती घ्या. स्वत:ला पुन्हा एकदा रिबूट करा. पण धीर सोडू नका.

त्याबरोबरच मला तुम्हाला सांगायचं की इतरांनाही समजून घ्या. जर तुम्हाला कोणी काही सांगितले तर कदाचित त्याचे दिवस वाईट जात असतील. माझ्यावर विश्वास ठेवा, मी सुद्धा हे शिकण्याचा प्रयत्न करत आहे”, असे अनसूयाने म्हटले आहे.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

दरम्यान, अनसूयाने शेअर केलेला हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा आहे. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर करत मी बरी असल्याचे सांगितले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनसूया ‘पुष्पा 2: द रुल’, ‘भीष्म पर्व’, ‘F2: फन अँड फ्रस्ट्रेशन’, ‘यात्रा’ आणि ‘रंगस्थलम’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकली.

Story img Loader