Pushpa 2 Leaked Online: सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेला ‘पुष्पा 2’ हा चित्रपट आज रिलीज झाला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. लोक सोशल मीडियावर चित्रटाचा रिव्ह्यू करत आहेत. पण आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी निर्मात्यांना काळजीत टाकणारी आहे. कारण हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे.
ऑनलाइन लीक झाला चित्रपट
ब्लॉकबस्टर ‘पुष्पा’ सिनेमाचा दुसरा भाग ‘पुष्पा 2’ अखेर तीन वर्षांनी आज प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अशातच एक निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे.
‘पुष्पा 2’ चित्रपट आज ५ डिसेंबर रोजी सकाळी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे अवघे काही शो झाली आहेत, याचदरम्यान हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. ‘पुष्पा 2’ हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिला भाग ब्लॉकबस्टर झाल्यावर निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. प्रदर्शनाची तारीख अनेकदा पुढे ढकलल्यानंतर अखेर हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला. एकीकडे लोकांमध्ये या चित्रपटाची तुफान क्रेझ आहे, तर दुसरीकडे हा चित्रपट लीक झाला आहे.
चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासांतच लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा धक्का बसू शकतो. ‘पुष्पा 2’ रिलीज झाल्यानंतर पायरसी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन लीक झाला आहे. आता लोक हा सिनेमा मोफत डाउनलोड करून पाहू शकतात. हा सिनेमा पायरसी प्लॅटफॉर्मवर 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये लीक झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक
कुठे लीक झाला चित्रपट?
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, Ibomma, Movierulz, Tamilrockers, Filmyzilla, TamilYogi, Tamilblasters, Bolly4u, Jaisha Moviez, 9xmovies आणि Moviesda या टोरेंट प्लॅटफॉर्म आणि पायरसी वेबसाइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे.
आज (५ डिसेंबर २०२४ रोजी) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 2’चे जवळपास सर्वच शो हाऊसफुल्ल झाले आहेत. अशातच हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे जर हा बहुप्रतीक्षित चित्रपट मोफत पाहता येत असेल तर प्रेक्षक थिएटरमध्ये जाणार नाहीत. यामुळे निर्मात्यांना कमाईच्या बाबतीत मोठा आर्थिक फटका बसू शकतो.