दाक्षिणात्य चित्रपटांना देशाबरोबरच परदेशातूनही पसंती मिळत आहे. त्यामुळेच साऊथचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरत आहेत. त्यामुळेच अनेक चित्रपटांचे दुसरे भागही बनवले जात आहेत. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा’चे चाहते ‘पुष्पा २’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा’च्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असतानाच या चित्रपटाने ‘आरआरआर’ला मागे टाकत ५० हून अधिक कोटींची कमाई केली आहे.

जेव्हा ‘पुष्पा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला. हा चित्रपट सर्वांनाच खूप आवडला. आता त्याचा सिक्वेल घेऊन येत बंपर कमाई करण्याचा विचार निर्माते करत आहेत. दरम्यान, चित्रपटाची प्रचंड मागणी लक्षात घेऊन निर्मात्यांनी या चित्रपटाच्या परदेशी थिएटर हक्कांसाठी मोठी किंमत निश्चित केली आहे. ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’ या दोन्ही चित्रपटांच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘केजीएफ २’ ने जगभरात १२०० कोटींची कमाई करून प्रत्येक रेकॉर्ड मोडला. त्याचबरोबर ‘पुष्पा २’बाबतही अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Vanvaas 1 Days Box Office Collection
‘वनवास’ची निराशाजनक सुरुवात, नाना पाटेकरांच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख
top 10 bockbuster movies 2024
Year Ender 2024 : ‘हे’ १० चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर, बॉक्स ऑफिसवरील कमाईसह प्रेक्षकांचीही मिळवली पसंती; वाचा यादी
Pushpa 2 OTT Release Update
‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार
Pushpa 2 box office Day 12
Pushpa 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम! जगभरातील कमाई १४०० कोटींहून जास्त, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड्स
Pushpa 2 Box Office Collection Day 10 71 percent growth on Saturday after allu arjun arrest
Pushpa 2 Box Office Collection Day 10: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या कमाईत ७१ टक्क्यांनी वाढ, ‘जवान’ आणि ‘RRR’ चित्रपटाला टाकलं मागे
Pushpa 2 Box Office Collection Day 9
अल्लू अर्जुनच्या अटकेच्या दिवशी Pushpa 2च्या कमाईत घट, कमावले ‘इतके’ कोटी

आणखी वाचा : राखी सावंत आणि शर्लिन चोप्राची एकमेकांविरोधात तक्रार, आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप

रिपोर्ट्सनुसार, ‘पुष्पा २’चे निर्माते या चित्रपटातून जास्तीत जास्त व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. एका वृत्तानुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी परदेशी हक्क विकण्यासाठी ८० कोटी रुपयांहून अधिक रक्कम मागितली आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’पेक्षाही ‘पुष्पा २’ च्या परदेशी थिएटर हक्कांची किंमत जास्त आहे. ‘आरआरआर’चे थिएटर राइट्स ८० कोटींना विकले गेले होते. आता अशा परिस्थितीत ‘पुष्पा २’ च्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी ८० कोटी किंमत ठरवली आहे. त्यामुळे हा चित्रपट परदेशातही बंपर कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : शाहरुख आणि सलमानच्या आगामी चित्रपटांना मागे टाकत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ने रचला नवा विक्रम

‘पुष्पा २’बद्दल प्रेक्षकांच्या मनात फार उत्सुकता आहे. ‘पुष्पा २’च्या शूटिंगलाही गेल्या महिन्यात सुरुवात झाली. अलीकडेच अल्लू अर्जुन आणि चित्रपटाच्या टीमने चित्रपटाच्या टीझरचे शूट पूर्ण केले. यादरम्यानचा अल्लू अर्जुनचा एक फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तसेच रश्मिकानेही शूटिंग सेटवरचा एक फोटो शेअर करत चित्रपटाच्या शूटिंगला तिने सुरुवात केल्याचं सांगितलं होतं. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त या चित्रपटात फहद फासिलही दिसणार आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader