Pushpa 2 Song Controversy : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रूल’ चित्रपटाबद्दलचे वाद थांबायचे नाव घेत नाहीत. एकीकडे प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यूबद्दल अल्लू अर्जुन आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाचे नवे गाणेही वादात अडकले आहे.
नुकतेच टी-सीरिजने ‘पुष्पा २’ चे गाणे ‘दमुंते पट्टुकोरा’ यूट्यूबवर प्रदर्शित केले होते. ‘अगर तुममें हिम्मत है, तो मुझे पकड़ लो, शेखावत!’ (‘जर तुमच्यात हिंमत असेल, तर मला पकडा, शेखावत!’) असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात अल्लू अर्जुनचे ‘पुष्पा’ हे पात्र फहाद फासिलच्या शेखावत या पोलिस पात्राला खुलेआम आव्हान देताना दाखवले आहे.
मात्र, नेटिझन्सनी हे गाणे प्रदर्शित करण्याच्या वेळेबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि आश्चर्य व्यक्त केले. संध्या थिएटर चेंगराचेंगरीच्या तपासादरम्यान हे गाणे प्रसिद्ध करून निर्माते पोलिस अधिकाऱ्यांवर टीका करत आहेत का? असे म्हणत काही नेटिझन्सनी टीका केली. यामुळे हे गाणे नंतर यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले.
चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
‘पुष्पा २’ च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी अल्लू अर्जुनने गाडीतून बाहेर येताच गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या मुलाला गंभीर दुखापत झाली असून तो अजूनही रुग्णालयात आहे.
हेही वाचा…सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
अल्लू अर्जुनला अटक
या प्रकरणाच्या संदर्भात अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला ४ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मिळाला. मात्र, कागदपत्रांच्या विलंबामुळे अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात घालवावी लागली.
हेही वाचा…“…तर माझं वजन ७० किलो असतं”, ५१ किलो वजन असलेली प्राजक्ता माळी म्हणाली, “मी कमी बेशिस्त…”
घरावर हल्ला
दरम्यान, चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेला आणि तिच्या रुग्णालयात असणाऱ्या मुलाला न्याय मिळावा यासाठी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर आंदोलक जमले होते. त्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली आणि प्रॉपर्टीचे नुकसान केले. या घटनेनंतर अल्लू अर्जुनच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.