Pushpa 2: The Rule : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या दोघांच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने सर्वच प्रेक्षकांना भुरळ पाडली. पहिल्या चित्रपटानंतर आता ‘पुष्पा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशात आता चित्रपट पाहण्यासाठी फक्त चार दिवसांची वाट पहावी लागणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अनेक अपडेट समोर येत आहेत. त्यामध्ये चित्रटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात होत आहे. तसेच तित्रपटाच्या रनटाइमचीही चर्चा होत आहे. चित्रपटाचा रनटाईम ३ तास १५ मिनिटांच्याही पुढे असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता चित्रपटाचा रनटाईम कमी होण्याची शक्यता आहे. कारण, गुरुवारी ‘पुष्पा २’ चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्यात आलं. मात्र, त्याआधी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटात काही महत्त्वाचे बदल करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : कीर्ती सुरेशच्या घरी यंदा सनई चौघडे वाजणार; स्वत: सांगितलं लग्नाचं ठिकाण

पुष्पा २ चित्रपटाला पाच ठिकाणी कात्री

पुष्पा २ चित्रपटात अनेक अक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. शिवाय यामध्ये मारामारीचे काही सीन फारच थरारक आहेत, त्यामुळे सेन्सॉर बोडाने यावर कात्री चालवण्यास सांगितलं आहे. यातील एका सीनमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या हातात एक तुटलेला हात घेऊन जाताना दिसत आहे, तर दुसऱ्या एका सीनमध्ये तो तुटलेला पाय हातात घेऊन जात आहे. हे दोन्ही सीन पाहता सेन्सॉर बोर्डाने (CBFC) निर्मात्यांना फक्त अभिनेत्यावर फोकस करा, म्हणजे बाकीचे दृष्य अपोआप झाकले जातील असे सांगितले आहे.

देशभरात प्रमोशन सुरू

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना दोघांनी ‘पुष्पा २’ चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे. तब्बल तीन वर्षे या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. अशात, या दोन्ही मुख्य कलाकारांसह चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका दोघांनी चित्रपटाच्या प्रमोशनात कोणतीही कसर सोडलेली नाही.

हेही वाचा : Video : रेश्मा शिंदेने घेतला हिंदी उखाणा! ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने लग्नात केली धमाल, नवरा-नवरीच्या दाक्षिणात्य लूकने वेधलं लक्ष

ॲडव्हान्स बुकिंग केव्हापासून सुरू होणार?

चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची असलेली उत्सुकता लक्षात घेता या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला शनिवारपासून (३० नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. ‘पुष्पा २ : द रुल’चं बजेट ४०० कोटी रुपये इतकं आहे. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमई करेल अशी निर्मात्यांना आशा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 the rule gets ua from cbfc asks for 5 cuts in movie rsj