Pushpa 2 The Rule Movie Public Review and Release Updates: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना या बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘पुष्पा 2’ आज गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. २०२४ मधील सर्वाधिक चर्चा असलेल्या बिग बजेट चित्रपटांपैकी एक ‘पुष्पा 2’ आहे. या चित्रपटाची क्रेझ देशातच नाही तर जगभरात आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा 2’ ने जगभरात अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर भारतात ८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाच्या कमाईचा वेग पाहता हा चित्रपट ग्रँड ओपनिंग करेल असं दिसतंय. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडेल, असं दिसतंय. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. ज्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला ते प्रेक्षक सोशल मीडियावर सिनेमाचे रिव्ह्यू देत आहेत.

हेही वाचा – २००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट, तब्बल २५ वर्षांनी मुंबईला परतली मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री; शेअर केला भावुक व्हिडीओ

४०० ते ५०० कोटी रुपयांदरम्यान बजेट असलेला हा चित्रपट जगभरात १२,५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा 2’ प्रेक्षकांना कसा वाटला, त्यांनी या चित्रपटाबद्दल एक्स (पूर्वीचे ट्विटर) काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते जाणून घेऊयात.

प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी ‘पुष्पा 2’ ला ब्लॉकबस्टर म्हटलं आहे. या चित्रपटाला त्यांनी 4.5 स्टार दिले आहेत. त्यांनी दिग्दर्शक सुकुमार यांचं कौतुक केलं आहे. चित्रपटातील संगीत व कलाकारांचा अभिनय उत्तम असल्याचं म्हटलं आहे.

“हाय व्होल्टेज कथेतर, चित्रपट एका हृदयस्पर्शी वळणावर संपतो आणि मग काहीतरी भयानक घडते,” असं एका युजरने लिहिलं आहे.

पुष्पा 2 चा पूर्वार्ध उत्तम आहे. अल्लू अर्जुनने चित्रपट गाजवलाय. तर श्रीवल्लीसोबत केमिस्ट्री जबरदस्त आहे, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.

‘पुष्पा 2 धमाकेदार चित्रपट आहे, नकारात्मक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका…,’ अशी पोस्ट एका युजरने केली आहे.

पुष्पा 2 बद्दल एका युजरची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 the rule public review fans said allu arjun and rashmika mandanna film blockbuster hrc